Limited time only: Access pro member benefits for less than $5/month. Access Classes, Stats, Priority Directory listing and more!Upgrade now

Pankaj Deshmukh

श्वासा शिवाय कदाचित मी काही क्षण जगू शकेन पण तुझ्याविना नाही हे वेड मन तुझ्यासाठीच काही ना काही मागण देवाकडे मागत असत ...माझी अवस्था त्या बिना पाण्या शिवाय तडफ़डना-या माशा सरखी झालिय माहीत आहे तू येणार नाही तरीही.... हे तारे तुटुन जातील , हा सुर्य विझुन जाईल पण आशेच्या शेवटच्या किरणा पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी तूझी वाट पाहतोय मी तूझी वाट पाहतोय .......

बोलत नाही पण बघतीस,
हसत नाही पण लाजतीस,
तुझ्या मनात आहे तरी,
काय? का मला उगाच
कोडयात टाकातीस,
... ... जाता येताना माझ्या कडे
तिरक्या
नजरेने पहातीस ,
दुरून पहिलो कि गालावर
लाली,
जवळ आलो कि मान
खाली,

------------------- उत्तर न मिळालेले मन

काचेहुन ही निर्मळ तुझ मन आहे..
बाणां पेक्षा ही धारदार तुझे नयन आहेत…
मधा पेक्षा ही मधाळ तुझी वाणी आहे…
पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे……

दुरून तुला पहायचो मी रोज
सगळ्यांच्या घोळक्यात तुला शोधायचो मी रोज ....

एका अभेद्य पडद्यात राहायची तू रोज ...
खाली मान घालून जायची तू रोज ....

तू कधीच हसली,बोलला नाहीस पण कधी
तुझ्या स्वप्नात असायचो का मी रोज ?

कधी दिवस कधी रात्र जागायचो मी रोज ...
एकांतात शब्दाबरोबर खेळायचो मी रोज ...

मी तुझ्या डोळ्यात मला शोधायचो रोज .....
पण कोणा दुस-याचेच प्रतिबिंब दाखवलेस तू एक रोज

का लोक आस लाऊन निघून जातात
फेसबुक वर आल्याचे दाखवतात
आणि एक दिवस अचानक गायब होतात

का लोक आस लाऊन निघून जातात
add केला तर Reject करतात
नुसते येण्याचे भासवतात
आणि एक दिवस अचानक गायब होतात...

---------------- पंकज देशमुख (निर्मल मन - एक उत्तर न मिळालेले मन )

मी हा असाच आहे

का कुणास ठाऊक पण तुझाच विचार करणारा
कितीही परका मानला तरी तुला आपला म्हणनारा !!!

तुझ्या सुखात सुख माननारा
तुलाच पुढील आयुष्यात साथीदार पाहणारा !!!

तुझ्या मनात स्वतःसाठी जागा पाहणारा

===== पंकज देशमुख

तुझ्यापासुन दुर जाण्यास
मन माझ वळत नाही
आठवणींत तुझ्या रमताना
वेळ मला पुरत नाही
माझ्या ह्दयातल प्रेम
तुझ्या डोळ्यात मला दिसाव. माझी एकच ही ईच्छा
देवाला पण का कळत नाही?

  • 120 Affection
  • 8,585 Photo Views
  • 13 Followers
  • 2 Following
  • Pune, Maharashtra, India